(म्हणे) ‘मुसलमानांचा चुकीचा इतिहास सांगून सरकार हिंदूंमध्ये चीड निर्माण करत आहे !’-अबू आझमी
स्वत:ला धमकी मिळाल्याची तक्रार करतांना अबू आझमी यांची सरकारवर टीका !
मुंबई – सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ध्रुवीकरण केले जात आहे. भाजप अगोदरच या मार्गावर आहे. हे सरकार हिंदू-मुसलमान यांच्यात भांडण निर्माण करत आहे. मुसलमानांचा चुकीचा इतिहास सांगून हिंदूंच्या मनात चीड निर्माण केली जात आहे, असे बेताल वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे. अबू आझमी यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात त्यांना जिवे मारण्याची धमकी आल्याविरोधात तक्रार केली आहे. या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. (असे मोघम बोलण्यापेक्षा मुसलमानांविषयी कोणता इतिहास चुकीचा सांगितला गेला, हेही अबू आझमी यांनी सांगावे. – संपादक)
समाजवादी पार्टी के नेता अबु आजमी को फोन पर जान से मारने की धमकी, औरंगजेब का समर्थन करने पर मिली धमकी, अबु आजमी में कोलाबा थाने में #FIR दर्ज कराई, मुंबई पुलिस आरोपी की तलाश में जुटी..
Watch: https://t.co/vh7rgGVG8d#Mumbai #Bharat24Digital @abuasimazmi @MumbaiPolice pic.twitter.com/j2Q8Yylwpc
— Bharat 24 – Vision Of New India (@Bharat24Liv) January 21, 2023
संपादकीय भूमिकाआतापर्यंत अशी बेताल विधाने करणार्यांकडून याहून वेगळे काय बोलले जाणार ? |