संमेलनात पंचपक्वानांसाठी अधिक खर्च करण्यापेक्षा तो पैसा मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन यांसाठी खर्च केला असता, तर ते उचित झाले असते !
मराठी साहित्य संमेलनात पंचपक्वानांची मेजवानी !
वर्धा, २२ जानेवारी (वार्ता.) – मराठी साहित्य संमेलनाला राज्य आणि राज्याबाहेरून अनुमाने २ सहस्र साहित्यिक, कवी, विचारवंत आणि साहित्य रसिक प्रतिनिधी उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. या प्रतिनिधींची अल्पाहार, भोजन आणि निवास यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आयोजकांकडून त्यांच्यासाठी पंचपक्वानांची रेलचेल असणार आहे.
१. उद़्घाटनाच्या पहिल्या दिवशी सकाळी अल्पाहाराला उत्तपम, गार्डन इडली, मैसूर वडा, बनारसी चुरामटर आणि दालबदाम शिरा असेल. दुपारच्या जेवणात पनीर अकबरी, वेज कोल्हापुरी, डाळफ्राय, मिस्सीपुरी, मिस्सी पराठा, स्ट्रॉबेरी रसमलाई, मावावाटी, दहीवडा आणि कॉर्नकटलेट आहे. रात्रीच्या जेवणात लच्छेदार रबडी, केसरकॉईन जिलेबी आणि सीताफळ छेनापाईज ही ३ मिष्ठान्ने, तसेच अन्य पदार्थांत इंदुरी दहीवडा, मिक्स पकोडे, कढाई पनीर, मेथी मटर मलाई आणि हैदराबादी वांगे असेल. झुणका, बिस्कीट भाकर, कढी, डाळमखनी, गट्टे पुलाव, वाफवलेला भात, मिनी तंदुरी, फुलका, मिस्सीपुरी आणि स्टिक मलाई कुल्फी हेही पदार्थ असतील.
२. दुसर्या दिवशी सकाळी अल्पाहाराला इंदोरी पोहा, चना मोट, तिखट चिवडा, मिनी आलूकोफ्ता आणि वेजी सँडविच आहे. या दिवशी शनिवार असल्याने उपवास असणार्यांसाठी भगरपुलाव, दही, साबुदाणा वडा, फराळी चिवडा आणि इलायची केळी ठेवण्यात येणार आहेत. दुपारच्या जेवणात फ्रूट श्रीखंड, गुलाबजाम, मिश्रदालवडा, मटार कचोरी, मटार पनीर, सावजी कोफ्ता, दाळभाजी, दाळतडका, दमतवा सावजी आणि फुलके असा बेत आहे.
३. उपवासासाठी राजगिरा पुरी, आलूशिरा, आलूसाग, फ्रेश फ्रूट, साबुदाणा खिचडी ठेवण्यात आली आहे. रात्रीच्या जेवणात पुरणपोळी, केसर रसगुल्ला, वेजकटलेट, जोधपुरीवडा, पनीर बटर मसाला, मलाईकोफ्ता, सेवटमाटर, दालजिरा, दालतडका, व्हेज बिर्याणी, फुलका, मिनीतंदुरी, बटर पोळी अशी पक्वान्ने असतील.
४. ५ फेब्रुवारीला अल्पाहाराला ब्रेडरोल, बडवापुरी, आलूकोहळे साग, व्हेज उपमा, चटणी, दिलजानी असा आहार आहे, तर दुपारच्या जेवणात फ्रूट कस्टर्ड, खवापुरी, मिनी मटार कोफ्ता, मद्रासी पकोडा, पनीर पसंदा, काश्मिरी कोफ्ता, दाळयलो, दाळ फंटीयर, वाफवलेला भात, मसाला पुलाव आणि कढी असा मुख्य बेत आहे. रात्रीला केसर चमचम, ड्रायफ्रूट हलवा, पंप मटार, सावजी पनीर, मसाला वांगे, आलूमेथी मटर, दाळतडका, स्पेशल पुलाव, फुलका आणि दोन प्रकारचे पराठा असतील. यासमवेतच संमेलनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजे २ फेब्रुवारी या दिवशी येणार्यांना जिलेबीसह साधे जेवण मिळेल.