भाव-भक्तीची मकरसंक्रांत !
‘कोणी म्हणे उत्तरायण,
कोणी म्हणे बिहू ।
कोणी म्हणे पोंगल,
तर कोणी म्हणे खिचडी ।
आम्ही साधक केवळ भावाच्या
तिळात भक्तीचा गूळ मिसळून ।
साजरी करतो भाव-भक्तीमय मकरसंक्रांत ॥
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, व्यष्टी आाणि समष्टी साधनेसाठी आवश्यक गुणांचे दान आम्हाला प्रदान करावे, अशी आपल्या पावन चरणी भावपूर्ण प्रार्थना करतो.
मकरसंक्रांतीच्या पावनसमयी गुरुरूपाला माझा भावपूर्ण नमस्कार !’
– श्री. शंभू गवारे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४५ वर्षे), हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत संघटक, (१८.१.२०२३)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |