घाटकोपर (मुंबई) येथील हिंदु जनसंघर्ष मोर्च्यात सहभागी १ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंची चेतावणी !
‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधी कायदे होईपर्यंत हिंदूंचा संघर्ष चालूच राहील !
घाटकोपर (मुंबई), २२ जानेवारी (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ या घटनांच्या विरोधात धर्मप्रेमी हिंदू रस्त्यावर उतरले आहेत. यापुढे अशा घटना हिंदु समाज सहन करणार नाही. सरकारने आता हिंदूंचा अंत पाहू नये, हिंदु धर्मावरील या आघातांच्या विरोधात लवकरात कठोर कायदे करावेत. हे कायदे होईपर्यंत हिंदूंचा संघर्ष चालूच राहील, अशी चेतावणी घाटकोपर येथे हिंदु संघर्ष मोर्च्यात एकवटलेल्या सहस्रो हिंदु धर्मप्रेमींनी दिली. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मागणीसाठी मोर्च्यात सहभागी झाले होते. २२ जानेवारी या दिवशी येथे हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्च्याच्या प्र्रारंभी श्री. विवेक सावंत यांनी शंखनाद केला. अधिवक्ता राहुल पाटकर आणि हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. अनंत वंजारे यांनी धर्मध्वजाचे पूजन केले.
जात-पात, पद, पक्ष, संघटना, संप्रदाय या सर्व बिरुदे बाजूला ठेवून सर्वजण ‘हिंदू’ म्हणून या मोर्च्यात सहभागी झाले होते. भगवे ध्वज हातात घेऊन, भगवे फेटे डोक्यावर घालून आणि कायद्याची मागणी करणारे फलक हातात धरून हिंदुत्वाचा जयघोष करत हिंदू धर्मप्रेमी मोर्च्यांत सहभागी झाले होते. अनेक धर्मनिष्ठ हिंदू स्वत:ची वाहने घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. मोर्च्यामध्ये ध्वनीवर्धकावरून हिंदूंना धर्मकार्यासाठी योगदान देण्याचे करण्यात येत असलेले आवाहन प्रेरणादायी होते. (रस्त्याच्या दुतर्फा असलेले आणि मार्गाने जाणारे हिंदू थांबून ध्वनीकावरून करण्यात येणारे आवाहन आणि घोषणा थांबून येत होते.) मोर्च्यातील सहभागी हिंदूंचा उत्साह पाहून रस्त्यावरून जाणारे काही धर्मप्रेमीही मोर्च्यात सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी सनातनच्या धर्मप्रचारक सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
फलक वाचून महाविद्यालयातील युवक मोर्चासाठी येणे !
घाटकोपर येथील आर्.जे.सी. या महाविद्यालयातील रोहन यादव, दिव्यांश जैन, प्रियांशू गुप्ता हे युवक ठिकठिकाणी लावलेले मोर्च्याचे फलक वाचून मोर्च्यात सहभागी झाले होते.
यापुढे धर्मावरील आघात हिंदू सहन करणार नाहीत ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
घाटकोपर येथील भारत सोसायटी रहिवासी संघाच्या परिसरात भव्य मदरसा अनधिकृतपणे बांधण्यात येत आहे. पोलीस आणि महानगरपालिका येथे तक्रारी करूनही मदरशावर अद्याप कारवाई झालेली नाही. हे सर्व रोखण्यासाठी यांविषयी कठोर कायदा होणे आवश्यक आहे. यापुढे हिंदु धर्मावरील आघात हिंदू सहन करणार नाहीत.
… तर हिंदु युवती लव्ह जिहादला बळी पडल्या नसत्या !- वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, मुंबई समन्वयक, रणरागिणी शाखा
धर्म आणि संस्कृती सोडणे म्हणजे संकटाला निमंत्रणे देणे होय. लव्ह जिहादमध्ये फसलेल्या हिंदु युवतींनी हिंदु धर्मानुसार आचरण केले असते, स्वरक्षण प्रशिक्षण घेतले असते, तर त्या लव्ह जिहादला बळी पडल्या नसत्या.
लहानग्या बालकांना घेऊन महिलांचा मोर्च्यात सहभाग !
‘लव्ह जिहाद’ला बळी पडून हिंदु युवतींचे जीवन उद़्ध्वस्त होऊ नये, यासाठी या विरोधात कठोर कायदा व्हावा, या मागणीसाठी सांताक्रूझ येथील सौ. मैथिली ढोले या त्यांच्या १ वर्षाच्या बाळाला घेऊन, तर दहिसर येथील सौ. सुजाता पुजारे या त्यांच्या २ मासांच्या बाळाला घेऊन मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. (धर्मकार्यासाठी छोट्या बालकांना घेऊन मोर्च्यात सहभागी झालेल्या या रणरागिणींचा आदर्श समस्त हिंदूंनी घेऊन धर्मकार्यासाठी स्वत:चे योगदान द्यावे. – संपादक)
क्षणचित्र – मोर्च्याच्या मार्गात अनेक ठिकाणी महिला, मुले आणि वृद्ध मोर्चा पहाण्यासाठी उभे होते.
मोर्च्यात सहभागी झालेल्या आणि घाटकोपर येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया !
१. हिंदूंसाठी कुणी लढत नाही. हिंदु जनजागृती समिती हिंदूंसाठी लढत आहे. – श्री. आशिष पवार
२. श्री. सुनील शिर्के, घाटकोपर – हिंदु जनजागृती समिती जे कार्य करत आहे, ते व्हायला हवे. समिती करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.
३. श्री. नारायण राजपूत – हे कायदे यायला हवेत. हिंदु राष्ट्र यायलाच पाहिजे.
४. श्री. शाम शेलार, घाटकोपर – हिंदूंचे संघटन झाले नाही, तर देश अधोगतीला जाईल.
५. श्री. अमित धरमसिंह, घाटकोपर – केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशात हे कायदे व्हायला हवेत. यासाठी राजकारण बाजूला सारून हिंदू म्हणून एक व्हायला हवे.
६. श्री .शिवशंकर – समिती जे करत आहे, ते योग्य आहे. यापुढे कुठे मोर्चा असेल, त्यामध्ये मी सहभागी होईन.
७. श्री. विलास खैरे, घाटकोपर – हे कायदे होण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला हवे.
८. श्री. बाबा हांडे, माजी नगरसेवक, शिवसेना उद्धव ठाकरे गट – हिंदू राष्ट्र व्ह्यालाच पाहिजे. आज हिंदू मुलींना लव्ह जिहाद द्वारे फसवले जात आहे.याविरोधात हिंदूंची एकजूट व्हायला पाहिजे. सरकारने लव्ह जिहाद, लँड जिहाद रोखण्यासाठी कडक कायदे करायला पाहिजेत.
९. श्री. प्रभाकर भोसले, अध्यक्ष, श्री शिवकार्य प्रतिष्ठान – लव्ह जिहाद वाढत आहे, हिंदू मुलींना फसवून हत्या होत आहे, सरकारने कठोर कायदे करून दोषींना एका वर्षात कडक शिक्षा द्यावी.
वैशिष्ट्यपूर्ण – श्री. अरुण पाटील या दुकानदाराने मोर्चा जात असतांना दुकानामध्ये उभे राहून घोषणा दिल्या.
उपस्थित संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, हिंदु राष्ट्रसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिंदे गट, ठाकरे गट, बजरंग दल, भारतीय जनता पक्ष, योग वेदांत सेवा समिती, सनातन वैदिक संस्कृती केंद्र, भारत सोसायटी संघ, घाटकोपर, परशुराम तपोवन आश्रम, वसई, तसेच श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळी, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान