‘सी-२०’च्या अध्यक्षपदावर माता अमृतानंदमयींची नियुक्ती !
नागपूर – ‘जी-२०’चा उपक्रम असणार्या ‘सी-२०’च्या अध्यक्षपदी भारत सरकारने माता अमृतानंदमयींची नियुक्ती केली आहे. नागपूर येथे २२ आणि २३ मार्च या दिवशी आयोजित ‘जी-२०’ परिषदेत २९ देशांतील प्रतिनिधी सहभागी होतील.
विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सांगितले, हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष असल्याने पाहुण्यांना ज्वारी आणि बाजरी, तसेच रागीच्या भाकरीसह विविध पदार्थांची मेजवानी असेल. परिषदेची थीम ‘लोकहितासाठी दबावगट म्हणून काम करण्यात नागरी समाजाची सकारात्मक भूमिका’ अशी आहे. परिषदेच्या दृष्टीने शहरातील रस्ते खड्डेमुक्त केले आहेत. (खड्डेमुक्त सुविधा अन्य वेळी का करण्यात येत नाही ? – संपादक)