मारहाणीप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाकडून १५ फेब्रुवारीपर्यंत दिलासा !
मुंबई – अपघातामध्ये अपक्षचे आमदार बच्चू कडू यांना झालेल्या दुखापतीमुळे शासकीय अधिकार्याला मारहाण केल्याच्या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयाने पुढे ढकलली आहे. ही सुनावणी १५ फेब्रुवारी या दिवशी होईल. या सुनावणीला उपस्थित न राहिल्यास अटकेचा आदेश काढण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. वर्ष २०१६ मध्ये मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातील तत्कालीन उपसचिव भाऊराव गावित यांना बच्चू कडू यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.