‘सम्मेद शिखरजी’ या धार्मिक स्थळाला ‘तीर्थक्षेत्र’ घोषित करा !
सांगोला येथे हिंदु जनजागृती समिती आणि जैन समाज यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन !
सांगोला (जिल्हा सोलापूर), २२ जानेवारी (वार्ता.) – झारखंड राज्यातील ‘सम्मेद शिखरजी’ या जैन समाजाच्या दृष्टीने पवित्र असलेल्या धर्मस्थळाला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे, या मागणीसाठी सांगोला येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त जैन समाज यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांच्या वतीने अव्वल कारकून एम्.एन्. पेटकर यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी सर्वश्री प्रदीप मार्डे, राजन देशमाने, संतोष मार्डे, नितीन लुंगारे, अजिंक्य देशमाने, संतोष भोसले, मनोज मंगळवेढेकर, संतोष पाटणे, बाळासाहेब गोसडे, गणपत पटेल, मोहन पटेल, अक्षय क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.