चंद्रपूर येथील ५ स्थानिक अधिवक्त्यांकडून तक्रार प्रविष्ट !
|
संभाजीनगर/चंद्रपूर – आतंकवादी आक्रमणाचे ‘मॉक ड्रिल’ चालू असतांना आतंकवाद्यांची भूमिका करणार्या पोलिसांनी ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्याचा प्रकार चंद्रपूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे चंद्रपूर येथील ५ स्थानिक अधिवक्त्यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
मुसलमानांचा द्वेष करून त्यांच्या भावना दुखावणार्यांवर कारवाई करण्याची मागणी युवा नेते तथा समाजसेवक ओसामा अब्दुल कदीर मौलाना यांनी २१ जानेवारी या दिवशी जिन्सी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ‘या प्रकरणी कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. निवेदनाची प्रत राष्ट्रपती, राज्यपाल, गृहमंत्री आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांनाही पाठवण्यात आली आहे.
१. तक्रारीनुसार येथील महाकाली मंदिरात ११ जानेवारी या दिवशी आतंकवादी आक्रमणाचे ‘मॉक ड्रिल’ करण्यात आले होते. या वेळी जे पोलीस आतंकवादी झाले होते, त्यांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा दिल्या होत्या.
२. त्यातून दाखवण्यात आले की, एका विशिष्ट धर्माचे अनुयायी हे आतंकवादी असतात. (प्रत्येक मुसलमान हा आतंकवादी नसला, तरी प्रत्येक आतंकवादी हा मुसलमान का असतो ? याचे उत्तर अधिवक्ते देतील का ? – संपादक)
३. हे पोलिसांचे कृत्य संबंधित समाजाला अपकीर्त करणारे आणि इस्लाम हा आतंकवादी धर्म असल्याचा अपसमज पसरवणारे आहे. जर पोलिसांनी अशीच भूमिका घेतली, तर समाजात द्वेषाची भावना वाढीस लागेल. (धर्मांध मुसलमान हे आक्रमणकर्ते असतात, हे आतापर्यंत त्यांनी केेलेल्या दंगलींवरून सर्वांनाच ज्ञात आहे. त्यामुळे अशा धर्मांधांच्या विरोधात समाजात द्वेष नव्हे, तर चीड आहे. त्यामुळे प्रथम या धर्मांधांना आवर घालण्याचे काम अधिवक्त्यांनी करावे. – संपादक)
४. यातून सामाजिक वातावरण दूषित होईल. राज्यघटनेत नमूद केलेल्या कर्तव्यांमध्ये सामाजिक बंधुत्व वाढीला लावणे हे कर्तव्य आहे. (सामाजिक बंधुत्व वाढीला लावण्याचे काम किती मुसलमानांनी केेले आहे ? याचे उत्तर हे अधिवक्ता देतील का ? – संपादक) त्यामुळे संबंधित पोलिसांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगर शहरातील ‘मॉक ड्रिल’मध्येही ‘नारा-ए-तकबीर अल्लाहू अकबर’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या.
‘मॉक ड्रिल’ म्हणजे काय ?भविष्यातील आपत्तीजनक घटना किंवा आता समोर असलेली समस्या टाळण्यासाठी अंदाज घेऊन आधीच खोटे प्रयोग करून पाहिले जातात. यात संबंधितांची सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची किती सिद्धता आहे, हे लक्षात येते. या संपूर्ण प्रक्रियेला ‘मॉक ड्रिल’ असे म्हणतात. |
संपादकीय भूमिका
|