आज कराड येथे टी. राजासिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘हिंदु गर्जना मोर्चा’
कराड, २२ जानेवारी (वार्ता.) – येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, या मागण्यांसाठी २३ जानेवारी या दिवशी तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘हिंदु गर्जना मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याचा प्रारंभ सकाळी १० वाजता येथील श्री पांढरीचा मारुति मंदिरापासून होणार असून राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ हिंदूंंनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.