‘रामचरितमानस’वर बंदी घाला !
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांची हिंदुद्वेषी मागणी !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – रामचरितमानसमध्ये सर्व काही कचरा आहे. हाच धर्म आहे का ? रामचरितमानसमधील काही भागांवर माझा आक्षेप आहे. यामध्ये गोस्वामी तुलसीदास यांनी शुद्रांना ‘अधम’ जातीचे म्हटले आहे. धर्माच्या नावावर विशेष जातींचा अवमान करण्यात आला. त्यामुळे ‘रामचरितमानस’वर बंदी घातली पाहिजे, अशी संतापजनक मागणी समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केली आहे.
सौजन्य : CNN-News18
मौर्य पुढे म्हणाले की, ब्राह्मण कितीही लंपट, दुराचारी, अशिक्षित आणि गावंढळ असला, तरी त्याला पूजनीय म्हटले गेले आहे, तर ‘शूद्र कितीही ज्ञानी, विद्वान, ज्ञाता असला, तरी त्याचा सन्मान करू नये’, असे म्हटले आहे. हा काय धर्म आहे ? जर हाच धर्म असेल, तर मी याला नमस्कार करतो. (असे कुठे घडत आहे का ? ‘खोटे बोला पण रेटून बोला’, अशाच मानसिकतेचे मौर्य !- संपादक) अशा धर्माचा सत्यानाश होवो, जो आमचा सत्यानाश इच्छित आहे. (गेली अनेक दशके जे आतंकवाद करून लक्षावधी लोकांचा सत्यानाश करत आले आहेत आणि करत आहेत, त्यांच्या धर्माविषयी मौर्य असे कधी म्हणणार नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक) जर अशा प्रकारचे विधान कुणी केले, तर धर्माचे मूठभर ठेकेदार म्हणतात की, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. (‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद करणे) कोण आणि कुणामुळे म्हणतात, हे मौर्य सांगतील का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|