पाकमध्ये विवाहित हिंदु महिलेचे अपहरण करून बलात्कार !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – शांती जोगी या विवाहित हिंदु महिलेचे ४ दिवसांपूर्वी अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले होते. आता ती तिच्या पालकांकडे परत आली आहे. ‘या महिलेने आरोप केला आहे की, तिचे इब्राहिम मंगरियो आणि त्याच्या सहाकर्यांनी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. आता ते पुन्हा अपहरण करण्याची धमकी देत आहेत’, अशी माहिती पाकमधील ‘हिंदु ऑर्गनायझेशन ऑफ सिंध’चे संघटक नारायण दास भिल यांनी ट्वीट करून दिली.
संपादकीय भूमिकापाकमधील हिंदूंवर होणार्या अत्यारांवरून भारत सरकार पाकला खडसावत का नाही ? |