पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थनार्थ ५० सहस्र साधू-संत रस्त्यावर उतरणार !
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील साधू-संत आणि पुजारी यांच्या संघटनांनी छत्तीसगडच्या बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थनार्थ एक ठराव संमत केला आहे.
#बागेश्वर_धाम_सरकार के पंडित श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री जी मेरे भाई के साथ मै हमेशा साथ खडा हूं और आगे भी साथ में खडा रहूंगा उनको मेरा पूर्ण समर्थन है 🙏🚩- @DN_Thakur_Ji#बागेश्वर_धाम_सरकार pic.twitter.com/JlaCFXvoRo
— ꧁Deepak parashar (@Deepakprakash94) January 22, 2023
यात म्हटले आहे की, कुठली संस्था पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर आरोप करत असेल किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा आणत असेल, तर त्यांच्या विरोधात ५० सहस्र साधू-संत रस्त्यावर उतरतील.
संत आणि पुजारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र दीक्षित म्हणाले की, जर कुणी वैदिक धर्माचरण करणारा आणि कथाकार यांचा अपमान करत असेल, तर आम्ही सहन करणार नाही.