पाकमधील ईशनिंदा कायद्यातील शिक्षा अधिक कठोर केल्यावरून पाकिस्तान मानवाधिकार आयोगकडून चिंता व्यक्त !
|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने देशातील ‘गुन्हेगारी कायदा (संशोधन) अधिनियम २०२३’च्या अंतर्गत ईशनिंदेच्या संदर्भातील तरतुदींविषयी चिंता व्यक्त केली आहे. हा सुधारित कायदा १७ जानेवारी या दिवशी पाकिस्तानच्या संसदेत संमत करण्यात आला.
अल्पसंख्यक विरोधी साबित होगा पाकिस्तान में ईशनिंदा कानून में संशोधन, हिंदुओं का उत्पीड़न बढ़ने की आशंका#Pakistan #BlasphemyLaw https://t.co/COoxhBTlRJ
— Dainik Jagran (@JagranNews) January 21, 2023
१. या सुधारणेद्वारे या कायद्यात धार्मिक व्यक्तीच्या किंवा श्रद्धास्थानांच्या विरोधात अवमानकारक विधान करणार्याला असलेली ३ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षा आता जन्मठेपेपर्यंत वाढवली आहे. तसेच न्यूनतम शिक्षा म्हणून १० वर्षांचा कारावास असणार आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असणार आहे.
२. मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे की, या कायद्याचा अल्पसंख्यांकांच्या विरोधात शस्त्र म्हणून वापर होण्याची शक्यता आहे. यामुळे खोटे आरोप आणि सूड उगवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
Pakistan Blasphemy: पाकिस्तान का हथियार है ईशनिंदा कानून, ले रहा अल्पसंख्यकों की जान, मानवाधिकार आयोग चिंतित – pakistan blasphemy law being used as a weapon against religious minorities warn by pakistan human rights https://t.co/epzjOOQLiF
— गाज़ियाबाद365 (@Ghaziabad365) January 21, 2023
संपादकीय भूमिकाभारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा सातत्याने अवमान केला जात असतांना कुणालाही शिक्षा होत नाही, तर पाकमध्ये शिक्षा अधिक कठोर केली जात आहे, हे हिंदूंना लज्जास्पद ! |