पैसा कि वेळ – कोण महत्त्वाचे ?
‘पैसा आणि वेळ यांमध्ये काय महत्त्वाचे आहे ? या दोन्हीपैकी मनुष्याला अधिक आनंदी कोणती गोष्ट ठेवू शकते ? आनंद आणि वेळ यांच्याविषयी रॉबर्ट ग्रीन इंगरसोलने म्हटले होते, ‘स्वतः आनंदी होण्याचा सोपा उपाय, म्हणजे दुसर्यांना आनंदित करावे !’ तसेच अमेरिकन व्यावसायिक मायकेल लिबिऑफ यांच्या म्हणण्यानुसार ‘जर तुम्ही आपला पैसा वाया घालवला, तर तुमचा सर्व पैसा संपून जाईल; परंतु जर तुम्ही आपला वेळ वाया घालवला, तर तुमचे संपूर्ण जीवनच संपून जाईल.’
(साभार : मासिक ‘प्रभु प्रेम पुकार’, एप्रिल २०१७)