देशात दंगली घडवून आणण्याचा अल्पसंख्यांकांना जणू परवानाच !
भारतातील धार्मिक दंगली : समस्या आणि उपाय
भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. हा सर्व इतिहास कुणी लिहून काढतो म्हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. भारतात हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये काही ना काही कारणास्तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत. १५ जानेवारी २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘नूपुर शर्मा यांनी केलेल्या विधानावरून उत्तरप्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्र येथे झालेली दंगल, हिंदूंच्या आत्यंतिक द्वेषापायी मुसलमानांकडून केली जाणारी टीका अन् हिंदु कोणत्याही पक्षाचा असो, जिहादींच्या दृष्टीने तो काफीरच’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग पाहूया.
(भाग ३)
या लेखाचा भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/645397.html |
१. कायद्याच्या दृष्टीने मुसलमानांना मुभा आणि हिंदूंना दुय्यम वागणूक !
‘भारत हा हिंदूबहुल देश असला, तरी या देशात हिंदूच सर्वाधिक असुरक्षित आहेत. त्यांच्यावरच अनेक बंधने आहेत. त्यांच्यावरच कायद्यांचे पालन करण्याची सक्ती अधिक आहे. या देशातील हिंदू इतर धर्माविषयी वास्तवावर आधारित विधान करू शकत नाहीत आणि जर असे एखाद्याने केले, तर त्याच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो. मुसलमानांना मात्र हिंदू आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांवर वाटेल तसे बरळण्याची मुक्त मुभा अन् मोकळीक आहे. सध्या सामाजिक माध्यमांवर (सोशल मीडियावर) हिंदू आणि हिंदु देवता यांच्यावर गलिच्छ टिपणी करणार्या अनेक ध्वनीचित्रफिती (व्हिडिओ) प्रसारित होत आहेत; पण त्यावर कधी बंदी घालण्यात येत नाही किंवा असल्या ध्वनीचित्रफिती प्रसारित करणार्यांवर कधी कायद्याचा बडगा उगारण्यात येत नाही.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येविषयी मुसलमान नेत्यांकडून केली जाणारी विधाने !
२ अ. मौलाना बशीर याने दिलेली चेतावणी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वाटेल तशी विधाने करतांना तर या जिहादी वृत्तीच्या मुसलमानांच्या जिभेवरचे नियंत्रण पूर्णपणे सुटलेले असते. जून २०१८ मधील रमजान मासात मौलाना बशीर नावाच्या नेत्याने मुसलमानांना जिहादचे आवाहन केले. त्या वेळी त्याने म्हटले होते, ‘‘एक दिवस भारतात आणि अमेरिकेत इस्लामचा झेंडा फडकावला जाईल अन् मोदींची हत्या करण्यात येईल.’’
२ आ. नागपूरमधील काँग्रेसचे नेते शेख हुसेन यांनी केलेले विषारी वक्तव्य : नुकतेच ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणी ‘ईडी’ने (अंमलबजावणी संचालनालयाने) सोनिया आणि राहुल गांधी यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. त्या वेळी काँग्रेस पक्षाकडून देशभर निदर्शने करण्यात आली. नागपूर येथेही असेच एक आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी झालेल्या जाहीर सभेत बोलतांना काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन म्हणाले, ‘‘मोदी कुत्ते की मौत मरेगा ।’’(मोदी कुत्र्याप्रमाणे मरतील); पण या विषारी वक्तव्याचा निषेध त्या वेळी व्यासपिठावर उपस्थित असणार्या काँग्रेसच्या तीन माजी मंत्र्यांपैकी एकानेही केला नाही.
३. मौलाना तौकीर रझा याने देशात गृहयुद्ध पेटवले जाण्याविषयी दिलेली चेतावणी !
देशात मशिदींवर लावण्यात आलेल्या भोंग्यांवरून राजकारण तापले असतांना आणि मुसलमानानांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर फिरवला जात असतांना मौलाना तौकीर रझा म्हणाले, ‘‘अजानच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण आणि बुलडोझरची कार्यवाही न थांबवल्यास मुसलमान रस्त्यावर उतरतील अन् ज्या दिवशी मुसलमान रस्त्यावर उतरतील, त्या दिवशी त्यांना सांभाळणे कठीण होईल. भारतात महाभारत घडेल.’’
४. सैन्यभरतीची ‘अग्नीपथ’ योजना आणि त्यावरून दंगलखोरांनी केलेला विरोध
‘देशामधील बेरोजगारी न्यून व्हावी, तरुणांच्या पदरात घसघशीत अर्थलाभ पडावा, तरुणांच्या जीवनाला शिस्त लागावी, तसेच तरुणांच्या मनात देशाविषयीचे प्रेम वृद्धींगत व्हावे’, असे अनेक उद्देश समोर ठेवून केंद्रशासनाने सैन्यभरतीसाठी ‘अग्नीपथ’ योजना घोषित केली. या योजनेत सहभागी होणार्यांना ‘अग्नीवीर’ संबोधून त्यांना ४ वर्षांसाठी सैन्याच्या ३ दलांपैकी एका दलात नोकरी दिली जाणार आहे. या कालावधीत अग्नीविरांना मिळणारे घसघशीत वेतन, सोयी-सवलती, ४ वर्षांनंतर त्यांच्या नावाने होणारी पुष्कळ बचत, भविष्यात त्यांना सैन्य आणि इतर खासगी आस्थापने येथे मिळणार्या रोजगारांच्या संधी, हे सर्व काही तरुण अन् देश यांच्या हिताचे आहे. त्यामुळेच कोणताही विचारी तरुण या योजनेला विरोध करणार नाही; पण या देशातील काही विघ्नसंतोषी राजकीय पक्ष आणि समाजविघातक यांनी विनाकारण ‘अग्नीपथ’ योजनेला विरोध करून संपूर्ण देशाला अग्नीत झोकून दिले.
४ अ. बिहार आणि उत्तरप्रदेश येथे अग्नीपथ योजनेला विरोध म्हणून दंगलखोरांनी ५०० कोटी रुपयांची हानी करणे : बिहार आणि उत्तरप्रदेश येथे तरुणांनी अग्नीपथ योजनेला विरोध म्हणून हिंसक आंदोलन चालू केले. यामध्ये त्यांनी सार्वजनिक मालमत्तेला आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. रेल्वेच्या ८६ गाड्या जाळल्या. यामुळे रेल्वेच्या ३६९ गाड्यांची वाहतूक रहित करावी लागली. अनेक प्रवाशांना त्यांच्या बायका आणि लहान मुले यांच्यासह २ दिवस रेल्वेच्या ‘प्लॅटफॉर्म’वर असुरक्षित वातावरणात रहावे लागले. यामुळे रेल्वे खात्याचे, म्हणजेच जनतेच्याच ५०० कोटी रुपये मूल्याच्या संपत्तीची हानी झाली. लहान मुले असणार्या बसगाड्यांवरही दंगलखोरांनी दगडफेक केली. अनेक ‘बसगाड्या’ जाळण्यात आल्या.
४ आ. देशाची अतोनात हानी करणे, हाच दंगलखोरांचा एकमेव उद्देश : अशा प्रकारे देश जळत असतांना या आगीत झारखंडमधील काँग्रेसचे नेते इरफान अंसारी याने त्याच्या विषारी वक्तव्याने तेल ओतण्याचे काम केले. इरफान गरळ ओकतांना म्हणाला, ‘‘देश होगा खूनसे लथपथ, पर हम नहीं होने देंगे अग्निपथ ।’’(देशात पुष्कळ रक्त सांडेल; पण अग्नीपथ योजना कार्यान्वित होऊ देणार नाही.) कारण कोणतेही असो, देश पेटवणे, देशाची अतोनात हानी करणे, हा एकमेव ‘अजेंडा’ (कार्यसूची) जिहादी वृत्तीच्या दंगलखोरांचा आहे, हे अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे; पण ना नेते आणि ना हिंदु समाज शहाणा व्हायला सिद्ध आहे.
५. अनेक मुसलमानांना कट्टरतेची शिकवण दिल्याने त्यांच्यात जिहादी प्रवृत्ती वाढत आहे !
भारतातील आजवरच्या धार्मिक दंगलींत कोट्यवधी रुपयांची वित्त आणि सहस्रो लोकांची जीवितहानी झाली आहे. या दंगलींमुळे भारताची प्रगती अनेक वर्षे मागे गेली आहे. मुसलमानांनी सर्व धार्मिक दंगली पूर्वनियोजन करून घडवलेल्या असल्यामुळे यात मुसलमानेतर समाजाचीच अधिकाधिक जीवित आणि वित्त हानी झाल्याचे दिसून येईल. या धार्मिक दंगलींत मोठ्या कष्टाने उभारलेली घरे, उद्योग, व्यवसाय, दुकाने आणि वाहने सर्व काही भस्मसात होते. तसेच घराचा कर्ता पुरुष मारला गेल्यामुळे अनेक संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक घरातील स्त्रिया विधवा, तर लहान मुले आणि वृद्ध निराधार झाले आहेत.
अनेक मुसलमान मुलांना अगदी बालवयापासूनच घरी, मदरसा आणि त्यांचा समाज येथेही कट्टरतेची शिकवण दिली जाते. त्यापुढे जाऊन त्यांचे झाकीर नाईकसारखे धर्मगुरु, मुल्ला-मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) युवकांच्या मनात काफिरांविषयी एवढ्या मोठ्या प्रमाणात द्वेषाग्नी प्रज्वलित करतात की, त्यामुळे अशिक्षित, अल्पशिक्षित मुसलमान नव्हे, तर उच्चशिक्षित तरुणही पेटून उठतात आणि काफिरांविरुद्ध जिवावर उदार होऊन आत्मघातकी आक्रमण करण्यास प्रवृत्त होतात. जिहादची शिकवण आणि वातावरण वाढल्यामुळे उच्च शिक्षण प्राप्त करूनही त्यांच्यातील धर्मांधता अन् कट्टरता थोडीही न्यून होत नाही. उलट ते स्वतःचे शिक्षण आणि बुद्धीमत्ता यांचा वापर काफिरांचा अधिकाधिक विनाश करण्यासाठी करतात. या जिहादी वृत्तीच्या तरुणांच्या मनात काफिरांविषयी कोणतीही अल्पांशाने दयामाया नसते. त्यांच्या डोक्यात आणि डोळ्यांत सूड अन् विध्वंस यांचा अग्नी पेटलेला असतो. काफिरांची नृशंसपणे हत्या करणे, त्यांची घरे, दुकाने आणि वाहने जाळणे, अशी दुष्कृत्ये ते सहजपपणे अन् धर्मकृत्य म्हणून करतात.
६. सुनियोजितपणे दंगल करणारा मुसलमान समाज आणि बेसावध हिंदु समाज !
भारतात नित्यनियमाने पेटवल्या जाणार्या सर्व धार्मिक दंगली या पूर्वनियोजित असतात. प्रत्येक दंगलीच्या अगोदर सर्व मुसलमानांना, तसेच सामाजिक माध्यमांच्या गटांवर दंगलीचा दिवस अन् वेळ ठरवून दिलेली असते. दंगलीपूर्वी दगडांचा साठा, पेट्रोल बाँब, काचेच्या बाटल्या, तलवारी, चाकू, सुरे एवढेच नव्हे, तर पिस्तूल या सर्व घातक वस्तू आणि शस्त्र यांचे नियोजन करण्यात येते. मुसलमानेतर समाज मात्र नेहमीप्रमाणे बेसावध असतो. घरात साप निघाला, तर त्याला मारण्यासाठी त्याच्या घरात साधी काठीही नसते. त्यामुळे प्रत्येक दंगलीत बेसावध असणारे हिंदु, बौद्ध, जैन आणि शीख या मुसलमानेतर समाजाच्या जीवित अन् वित्त यांची अतोनात हानी होते. मुसलमानेतर समाज एकत्रित होऊन रस्त्यावर उतरेपर्यंत त्यांची व्हायची ती हानी होऊन गेलेली असते. नंतर पोलीसदलही रस्त्यावर उतरलेले असते. त्यामुळे अधिकाधिक हिंदूच पोलिसांकडून मार खातात आणि त्यांचीच मोठ्या प्रमाणात धरपकड होते.
७. हिंदू, हिंदु धर्म आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांवर टीका करणे, हा मुसलमानांचा धार्मिक अधिकार असल्याचे त्यांना वाटणे !
दंगलखोर मुसलमानांना दंगल पेटवण्यासाठी क्षुल्लक कारणही पुरेसे होते. हिंदूंनी त्यांच्या सण-उत्सवानिमित्त शोभायात्रा काढल्या, हिंदूंनी देवीदेवता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला की, मुसलमानांना राग येतो. मुसलमानांना हिंदूंची वाद्ये आणि हनुमान चालिसा यांचा त्रास होतो; पण गावागावांतील शेकडो मशिदीतून एकाच वेळी ध्वनीक्षेपकावरून कर्णकर्कश आवाजात होणारी अजान सर्व मुसलमानेतर समाजाने निमूटपणे ऐकून घ्यावी, अशी त्यांची अपेक्षा असते. त्या वेळी धर्मनिरपेक्षता धोक्यात येत नाही. ‘नमाजपठण करणे, हा मुसलमानांचा धार्मिक अधिकार आहे’, असे तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांकडून समर्थन करण्यात येते. हिंदू, हिंदु धर्म, हिंदूंची श्रद्धास्थाने यांवर वाटेल तशी अश्लील टीका करणे, हा त्यांना धार्मिक अधिकार वाटतो; पण त्यांच्या धर्माची कुणी चिकित्सा केली, तर तो जघन्य अपराध वाटतो.
८. मुसलमानांच्या कट्टरतावादाविषयी निधर्मीवाद्यांची अळीमिळी गूपचिळी !
केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील मुसलमानांची अशी ही एकच मानसिकता आहे. पाकिस्तानसह अन्य इस्लामी राष्ट्रांत मुसलमानेतर समाजाचा व्यक्ती मुसलमान धर्मावर टीका करणारा एक शब्दही उच्चारू शकत नाही; पण भारतात मात्र मुसलमानांना हिंदु, हिंदु धर्म, त्यांच्या देवीदेवता यांच्यावर वाटेल तशी अपमानजनक टीका करणे, दंगली भडकवणे, हिंदूंच्या दिवसाढवळ्या हत्या करणे या सर्वांची मुक्त मुभा आहे. यासह ‘सर तन से जुदा ।’ (डोके शरिरापासून वेगळे करणे) अशा प्रक्षोभक घोषणा देणार्या अनेक ध्वनीचित्रफिती सामाजिक माध्यमांवर उपलब्ध आहेत.
‘ऑल्टन्यूज’चा सहसंस्थापक महंमद झुबेर हा तर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे आणि मुसलमानांच्या धार्मिक भावना भडकावणे यांसाठी कुप्रसिद्ध आहे; पण अशा कृत्यांमुळे भारताची धर्मनिरपेक्षता धोक्यात येत नाही. अशा वेळी हिंदी सिनेसृष्टीतील ‘खाना’वळींच्या (खान नावांच्या अभिनेत्यांच्या) आणि ‘ॲवॉर्ड’वापसी (पुररस्कार वापसी) ‘गँगच्या’ (टोळीच्या) तोंडाला कुलूप लागलेले असते.
९. देशातील विकृत धर्मनिरपेक्षतेमुळे हिंदूंवर सातत्याने अन्याय होणे
‘पैगंबर यांच्याविषयीच्या एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात तस्लीम अहमद रहमानी यांनी हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळेच नूपुर शर्मा यांनी त्याला प्रत्युत्तर दिले’, असे पाकमधील मौलाना इंजिनीयर महंमद अली यांनी शर्मा यांचा बचाव करतांना म्हटले आहे; पण भारतात नूपुर यांची हत्या करण्याचे अनेक फतवे निघाले. तिच्या विरुद्ध अनेक न्यायालयांत दावे प्रविष्ट करण्यात आले; पण नूपुर यांना भडकावणार्या रहमानी यांच्या विरुद्ध कुणी तोंडातून ‘ब्र’ही काढला नाही. मुसलमानांच्या मतांसाठी लाचार आणि कणाहीन झालेले देशातील काही राजकीय पक्ष अन् त्यांचे नेते यांनी ‘धर्मनिरपेक्षते’ला अत्यंत विकृत रूप दिले आहे. यामुळे हिंदूंवर सातत्याने अन्याय होत आला आहे आणि त्याला स्वतःच्या मातृभूमीत सुखाने जगणे कठीण झाले आहे.
१०. मुसलमानांची देशनिष्ठा तपासणे आवश्यक आणि हिंदूंकडून केला जाणारा आत्मघात !
राजस्थानमध्ये दंगली पेटवल्या गेल्या, तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले, ‘‘हिंदु श्रीरामाच्या जयघोषाचे नारे विनाकारण जोरजोरात लावतात. त्यामुळे साहजिकच मुसलमानांच्या भावना दुखावतात.’’ श्रीरामाच्या जयघोषाने मुसलमानांच्या भावना दुखावण्याचे काय कारण ? आणि त्यांच्या भावना खरोखरच दुखावल्या जात असतील, तर अशांच्या या देशावरील निष्ठा तपासल्या पाहिजेत; पण दुर्दैवाने गहलोत यांच्यासारखे नेते याचा जाब मुसलमान समाजाला विचारण्याऐवजी दंगलीचे खापर हिंदूंवरच फोडतात. मुसलमानांच्या भावनांचा विचार करणारे नेते हिंदूंच्या भावना मात्र पायदळी तुडवतात. तरीही अशा हिंदुद्वेष्ट्या पुढार्यांना हिंदू निवडून देत असतील, तर याला ‘हिंदूंचा आत्मघात’ नाही तर अन्य काय म्हणावे ?
११. मुसलमानबहुल भाग संवेदनशील का होतो ?
२ एप्रिल २०२२ या दिवशी करौली (राजस्थान) येथे हिंदूंनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शोभायात्रा काढली होती. ही यात्रा मुसलमानबहुल वस्तीत आल्यानंतर मुसलमानांनी घराच्या छतावरून शोभायात्रेवर गोटामार (दगड-गोटे फेकणे) चालू केले. यामुळे दंगल भडकली; पण अशा दगडफेकीविषयी मुसलमानांना जाब विचारून त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी राजस्थानचे ग्रामीण विकासमंत्री रमेश मीणा म्हणाले, ‘‘संवेदनशील भागातून शोभायात्रा जाऊ देण्यास हिंदूंना अनुमती देणे, ही पोलिसांची चूक होती.’’ यावरून असा प्रश्न येतो की, मुसलमानबहुल भाग संवेदनशील का व्हावा ? हिंदूबहुल भाग कधी संवेदनशील होत नाही आणि हिंदूबहुल भागातून मुसलमानांच्या मिरवणुका जातात, तेव्हा त्यांच्यावर कधी गोटमार होत नाही. मुसलमानबहुल भाग काय पाकिस्तान आहे का, जिथे हिंदूंना कोणतेच धार्मिक स्वातंत्र्य नाही? राजकीय नेते प्रत्येक वेळी असत्य असूनही मतांसाठी मुसलमानांचीच बाजू घेऊ लागले, तर हा सारा देशच संवेदनशील होईल. याची जाणीव मुसलमानांचा अनाठायी अनुनय करणार्या नेत्यांनी ठेवली पाहिजे.
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ. (६.१२.२०२२)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/649605.html |