नागपूर येथे खासदार क्रीडा महोत्सवात पंच आणि आयोजक यांना मारहाण !
नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ‘खासदार क्रीडा महोत्सव’ चालू आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मुन्ना यादव यांच्या दोन्ही मुलांनी क्रिकेट सामना चालू असतांना पंचांसमवेत वाद घालून त्यांना मारहाण केली. सामन्याच्या आयोजकांनाही मारहाण केली. या संदर्भात पंचांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांच्याकडे तक्रार केली होती; मात्र कुठलीही कारवाई झाली नसल्याने पंचांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.