हिंदूंवरील अन्यायांना वाचा फोडण्यासाठी कुडाळ येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन ! – हेमंत मणेरीकर, हिंदु जनजागृती समिती
कुडाळ – लव्ह जिहाद, धर्मांतर, हलाल जिहाद, वक्फ बोर्ड, भूमी जिहाद अशा विविध मार्गांतून देश आणि हिंदु धर्म यांवर आघात आणि अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शहरातील कुडाळ हायस्कूलच्या पटांगणात २९ जानेवारी २०२३ या दिवशी सायंकाळी ५ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील हॉटेल स्पाईस कोकण येथे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेचे श्री. शंकर निकम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील आणि धर्मप्रेमी श्री. सतीश सामंत उपस्थित होते.
या वेळी श्री. मणेरीकर यांनी मंदिरांचे सरकारीकरण, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदूंच्या प्रभावी संघटनासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगितले.
या सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गोवा आणि गुजरात या राज्यांचे समन्वयक श्री. मनोज खाडये अन् हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक श्री. नीलेश सांगोलकर हे वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. २४ जानेवारी या दिवशी कुडाळ शहरात वाहनफेरीचे आयोजन या सभेच्या प्रचारासाठी २४ जानेवारी २०२३ या दिवशी सकाळी १० वाजता कुडाळ शहरातून भव्य वाहनफेरी काढण्यात येणार आहे. या फेरीसह २९ जानेवारी २०२३ या दिवशी होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन या वेळी करण्यात येणार आहे.