हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७ मशिदींना ३५ सहस्र रुपयांचा दंड !
मशिदींवरील भोंग्यांमुळे होणार्या ध्वनीप्रदूणाचे प्रकरण
हरिद्वार (उत्तराखंड) – येथील ७ मशिदींना भोंग्यांवरून ध्वनीप्रदूषण केल्याच्या प्रकरणी ३५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी पूरणसिंह राणा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. नैनीताल उच्च न्यायालय आणि शासनाने दिलेला आदेश यांद्वारे काही अटी ठेवून मशिदींवर भोंगे लावण्याची अनुमती देण्यात आली होती.
हरिद्वार में 7 मस्जिदों पर लगा 35000 रुपए का जुर्माना, 2 को हिदायत: चेतावनी के बाद भी तेज वॉल्यूम में दी जा रही थी अजान#Haridwar #Loudspeaker #Azan #Mosquehttps://t.co/tTuwlZGzHZ
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 20, 2023
त्यांचे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण करण्यात आले होते. चौकशीत हे स्पष्ट झाल्यावर हा दंड ठोठावण्यात आला. पथरी पोलीस ठाणे आणि प्रदूषण नियंत्रण बोर्ड (रुडकी) यांच्या चौकशीच्या अहवालाच्या आधारे या मशिदींना नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न आल्याने या ७ मशिदींना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. भोंग्यांची अनुमती घेणार्यांना दंड जमा करण्यास सांगण्यात आले आहे.
#हरिद्वार में तेज आवाज में लाउडस्पीकर बजाने पर 7 मस्जिदों पर 5-5 हजार रुपये जुर्माना, दो को दी गई चेतावनी pic.twitter.com/KAjQ3DOK1L
— HJS MadhyaPradesh (@mp_hjs) January 21, 2023
संपादकीय भूमिकाप्रत्येक वेळेला या मशिदींवरील भोंग्यांवर लक्ष ठेवत रहाण्यापेक्षा मशिदींवर भोंगे लावण्याचीच अनुमती रहित करण्याची आवश्यकता आहे ! |