ख्रिस्ती बनल्यास १५ सहस्र रुपये आणि ‘सुंदर मुली’शी विवाहाचे आमीष दाखवून हिंदूचे धर्मांतर !
आमिषाला बळी पडून हिंदूचे धर्मांतर; मात्र पश्चात्ताप झाल्याने हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथील सर्वेंद्र विक्रम सिंह नावाच्या हिंदु व्यक्तीने काही ख्रिस्ती लोकांवर आमिषे दाखवून धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे. फतेहपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, एका ख्रिस्ती व्यक्तीने त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास १५ सहस्र रुपये रोख आणि ‘सुंदर मुली’शी विवाह लावून देण्याचे आमीष दाखवले.
‘ईसाई बनने पर ₹15 हजार, दूसरे हिंदू को लाने पर ₹20 हजार’ : फतेहपुर में धर्मांतरण के लिए ‘सुंदर लड़की’ से शादी का लालच भी@RealRajanjha की रिपोर्ट#Fatehpur #chrishtianity #Religiousconversionhttps://t.co/l8YOQNmddO
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 20, 2023
१. सर्वेंद्र विक्रम सिंह यांनी तक्रारीत, ‘प्रलोभनांनंतर मी त्याला बळी पडलो. त्यानंतर मला एका चर्चमध्ये नेण्यात आले. तेथे ख्रिस्ती पाद्य्राशी माझी भेट झाली. मी धर्मांतर केल्यास केवळ पैसेच नव्हे, तर मला अनेक भेटवस्तूही मिळणार असल्याचे पाद्य्राने सांगितले’, असे म्हटले आहे.
२. पीडित सर्वेंद्रचे धर्मांतर देवीगंजच्या चर्चमध्ये करण्यात आले. यानंतर त्यांना सांगण्यात आले की, ‘तुम्ही ख्रिस्ती झाला आहात. आता तुमचे नातेवाईक, मित्र आणि गावकरी यांचे धर्मांतर करा. यासाठी तुम्हाला २० सहस्र रुपये मिळतील’.
३. ‘या ख्रिस्ती लोकांच्या संस्थेला परदेशातून पैसे मिळतात; म्हणूनच धर्मांतर करणार्यांना ‘तुम्हाला आयुष्यात पैशांची कमतरता भासणार नाही, असे सांगण्यात आले होते’, असे तक्रारीत म्हटले आहे.
४. काही काळानंतर सर्वेंद्र सिंह यांना स्वतःच्या कृतीचा पश्चात्ताप झाला आणि ते हिंदु धर्मात परतले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.