चीनकडून भारताच्या विरोधात जलयुद्धाची सिद्धता !
सीमेवरील नद्यांवर धरणांचे बांधकाम चालू !
बीजिंग – नेपाळ-भारत सीमेवर असलेल्या माबजा जांगबो नदीवर चीनने धरणाचे बांधकाम चालू केले आहे. उपग्रहाद्वारे प्रसारित केलेल्या छायाचित्रांद्वारे ही माहिती पुढे आली आहे. वर्ष २०२१ पासून चीन माबजा जांगबो या नदीवर मोठे धरण बांधत आहे. या धरणामुळे उत्तराखंडच्या परिसरातील पाण्यावर पूर्ण नियंत्रण मिळवणे चीनला शक्य होणार आहे. चीन बांधत असलेले हे धरण उत्तराखंडातील कालापानी परिसराच्या जवळ आहे. कालापानी हा परिसर भारत आणि चीन दोघांसाठी रणनीतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. चीनने सीमेवरील नद्यांवर धरणे बांधून भारताच्या विरोधात जलयुद्ध पुकारण्याचे षड्यंत्र आखले आहे.
न्यूज 18 इंडिया
अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरही धरण बांधण्यास प्रारंभ !
चीनने अरुणाचल प्रदेशला जवळ असलेल्या यारलुंग त्साग्पो नदीवर धरण बांधण्यास प्रारंभ केला आहे. या धरणाचे काम जलदगतीने चालू आहे. ‘या नदीवर धरण बांधून चीन ब्रह्मपुत्रेचा प्रवाह पालटू शकतो’, असे तज्ञांचे मत आहे. यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे.
संपादकीय भूमिकाचीनचे हे धोकादायक मनसुबे लक्षात घेऊन भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक ! |