संयुक्त राष्ट्रांच्या पदाधिकार्‍यांनी तालिबानच्या झेंड्यासह काढली छायाचित्रे

संयुक्त राष्ट्रांकडून क्षमायाचना

संयुक्त राष्ट्रांच्या पदाधिकार्‍यांचे तालिबानच्या झेंड्यासह छायाचित्र

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांच्या उपसरचिटणीस अमीना महंमद यांनी मागील आठवड्यात अफगाणिस्तानचा दौरा केला होता. या वेळी संयुक्त राष्ट्रांच्या काही पदाधिकार्‍यांनी तालिबानच्या झेंड्यासह छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली होती.

त्यावरून संयुक्त राष्ट्रांवर टीका होऊ लागल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी याविषयी क्षमा मागितली आहे. संयुक्त राष्ट्रांनी अद्याप तालिबानला आणि त्यांच्या अफगाणिस्तानमधील सरकारला मान्यता दिलेली नाही.