अल्पवयीन मुलांना गर्भनिरोधक न विकण्याचा आदेश कर्नाटक सरकारकडून मागे !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने १८ वर्षांखालील मुला-मुलींना गर्भनिरोधकांच्या विक्रीवर घालण्यात आलेली बंदी मागे घेतली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या दफ्तरामध्ये गर्भनिरोधक, सिगरेट आणि ‘व्हाईटनर’ सापडल्यानंतर औषध नियंत्रण विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले होते. बंदी मागे घेतल्यानंतर तज्ञ आणि औषध विक्रेते यांनी म्हटले आहे की, यामुळे नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित संसर्ग यांमध्ये वाढ होईल.