मधेपुरा (बिहार) येथील महाविद्यालयाच्या परिसरात श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यास बंदी !
विद्यार्थ्यांकडून विरोध !
समस्तीपूर (बिहार) – येत्या वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यास मधेपुराच्या बीपी मंडल अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे समस्तीपूरच्या जिल्हाधिकार्यांनी पूजेच्या काळात ‘डीजे’ (मोठा ध्वनीक्षेकपक) वाजवल्यास गुन्हा नोंदवण्याची चेतावणी दिली आहे.
#BreakingNews : बिहार के मधेपुरा के इंजीनियरिंग कॉलेज में सरस्वती पूजा पर रोक #RajasthanWithZee pic.twitter.com/TNrMRGUPc4
— ZEE Rajasthan (@zeerajasthan_) January 21, 2023
१. मधेपुराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात श्री सरस्वतीदेवीच्या पूजेवर बंदी घातल्याने विद्यार्थ्यांकडून अप्रसन्नता व्यक्त करण्यात येत आहे. प्राचार्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कुणी विनाअनुमती श्री सरस्वतीदेवीच्या पूजेचे आयोजन करत असेल, तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.
२. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी प्राचार्य अरविंद कुमार यांना अर्ज देऊन पूजेला अनुमती देण्याची मागणी केली होती; मात्र ती नाकारण्यात आली. मूर्ती स्थापन करण्यासही नकार देण्यात आला.
३. प्राचार्यांचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांना चित्र लावून पूजा करण्यास सांगितले होते, त्यांनी ते अमान्य करून गोंधळ घातला. जर त्यांना पूजा करायची असेल, तर ते वसतीगृहातील त्यांच्या खोलीमध्ये करू शकतात. सार्वजनिक पूजा केल्याने आपसांत वाद होण्याची शक्यता आहे. यामुळेच आम्ही अनुमती नाकारली आहे.
संपादकीय भूमिका
|