कटिहार (बिहार) येथे ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेक !
दगडफेकीची चौथी घटना
कटिहार (बिहार) – येथे ‘वन्दे भारत’ एक्सप्रेस रेल्वेगाडीवर दगडफेक करण्यात आली. यामुळे गाडीच्या एका डब्याची काच फुटली. ही गाडी न्यू जलपाईगुडीहून हावड्याला जात होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. या मार्गावरील या गाडीला प्रारंभ होऊन केवळ २१ दिवस झाले आहेत; मात्र यावर आतापर्यंत ४ वेळा दगडफेक करण्यात आली आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन पर फिर पथराव की घटना सामने आई है. न्यू जलपाईगुड़ी से हावड़ा जा रही वंदे भारत एक्सप्रेस पर बिहार के कटिहार जिले में पथराव हुआ है.#ATDigital #VandeBharat #Bihar pic.twitter.com/kFS2SZKEPG
— AajTak (@aajtak) January 21, 2023
संपादकीय भूमिकासरकारी संपत्तीची अशा प्रकारे हानी करणार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्याची आवश्यकता आहे ! |