नागपूर येथे खड्ड्यात पडून निवृत्त अधिकार्याचा मृत्यू !
नागपूर – कोंढाळी येथील चाकडोह शिवारात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह २० फूट खड्ड्यात पडून चालक पांचू भट्टाचार्य (वय ६४ वर्षे) यांचा मृत्यू झाला. ही घटना १९ जानेवारी या दिवशी दुपारी १२ वाजता घडली. भट्टाचार्य हे ‘इंडियन ब्युरो ऑफ माईन्स’चे सेवानिवृत्त अधिकारी होते.