डोंबिवली येथील २ ज्वेलर्सच्या दुकानांवर दरोडा !
ठाणे, २० जानेवारी (वार्ता.) – डोंबिवली पश्चिम येथील चिंचोड्याचा पाडा भागात जबरदास वैष्णव यांचे ‘श्री बालाजी ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे, तर कर्वे रस्त्यावर नारायण रायकर यांचे ‘रायकर ज्वेलर्स’ हे दुकान आहे. १९ जानेवारीच्या पहाटे ३ ते ५ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजा फोडून दुकानातील १३ लाख ६५ सहस्र रुपये किंमतीचे सोने-चांदी यांचे दागिने लुटून पलायन केले, तसेच पोलिसांना ओळख पटू नये; म्हणून चोरांनी दुकानातील सीसीटीव्ही आणि डी.व्ही.आर्. काढून नेले. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.
संपादकीय भूमिकाअसुरक्षित डोंबिवली शहर ! |