ख्रिस्ती समाज आणि चर्च यांवरील अन्याय-अत्याचार थांबवा ! – ख्रिस्ती समाजाची मूक मोर्च्याद्वारे मागणी
सांगली – ख्रिस्ती समाज आणि चर्चवर यांवर अन्याय-अत्याचार होत आहे. हे तात्काळ थांबावे आणि त्यासाठी कडक कारवाई करावी, या मागणीसाठी ख्रिस्ती समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. ज्या ज्या धर्मगुरूंवर आणि समाजातील लोकांवर खोटे खटले प्रविष्ट केले आहेत, ते तात्काळ मागे घ्यावेत, ज्या चर्चवर आक्रमण झाले, त्याची हानीभरपाई शासनाने द्यावी यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या. ‘संविधान बचाव ख्रिस्ती हक्क कृती समिती’ असा मुख्य फलक हातात घेऊन हा मोर्चा काढण्यात आला.
(निधर्मी असणार्या या देशात कायदा सर्वांना समान आहे. त्यामुळे संविधानिक मार्गाने ज्यांच्यावर गुन्हे नोंद झाले, ते न्यायालयात काही सिद्ध होण्याच्या अगोदर खोटे कसे काय ? अनेक ठिकाणी आमीषे दाखवून धर्मांतराच्या घटना उघड होत आहेत त्याविरोधात ख्रिस्ती समाज कधी बोलणार ? – संपादक)
‘होय मी भारतीय ख्रिश्चन आहे, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत’, यांसह अन्य फलक हातात धरले होते. मोर्च्यामुळे दीर्घकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती, तसेच सांगली-मिरज या मार्गावर प्रवास करणारे वाहनधारक, रिक्शाचालक यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.