वेणूगोपाल धूत यांची तात्‍काळ सुटका करण्‍याचे निर्देश !

आयसीआयसीआय बँक व्‍हिडिओकॉन कर्ज घोटाळा प्रकरण

वेणूगोपाल धूत

मुंबई – आयसीआयसीआय बँक व्‍हिडिओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणी व्‍हिडिओकॉन समूहाचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना १ लाख रुपयांच्‍या जामिनावर मुंबई उच्‍च न्‍यायालयाने २० जानेवारी या दिवशी जामीन संमत केला आहे, तसेच त्‍यांना तात्‍काळ कारागृहातून सोडण्‍याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाला (सीबीआय) अन्‍वेषणात संपूर्ण सहकार्य करावे, साक्षी-पुराव्‍यांशी कोणतीही छेडछाड करू नये, तसेच आपला पारपत्र (पासपोर्ट) जमा करत विनाअनुमती देशाबाहेर जाण्‍यास धूत यांना उच्‍च न्‍यायालयाने मनाई केली आहे. या प्रकरणी अन्‍वेषण करणार्‍या केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणेला मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेला हा आणखी धक्‍का आहे, तसेच या प्रकरणी हस्‍तक्षेप करत जामिनाला विरोध करणार्‍या काही अधिवक्‍त्‍यांची याचिका उच्‍च न्‍यायालयाने फेटाळून त्‍यांना २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.