यवतमाळ जिल्ह्यातील ५८ सहस्र बोगस मतदार वगळले
यवतमाळ, २० जानेवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील मतदार सूची अद्ययावत् करणे, आधारकार्ड मतदान कार्डशी जोडणे आणि निवडणूक विभागाने बी.एल्.आें.च्या साहाय्याने घरोघरी मतदारांची पडताळणी करणे यातून ५८ सहस्र बोगस मतदार वगळण्यात आले. (इतक्या सहस्रोंच्या संख्येत बोगस मतदार निर्माण होईपर्यंत निवडणूक अधिकारी काय करत होते ? – संपादक)