‘हिंदी’ ही राष्ट्रभाषा नाही’, असे नमूद करत राज्य सांस्कृतिक विभागाने चूक सुधारली !
पुणे – हिंदीला राज्यभाषेचा दर्जा बहाल करण्याच्या अध्यादेशातील चुकीवर सर्वच स्तरांतून टीका झाल्यावर शेवटी राज्य सरकारने पालट केला आहे. राज्य ‘हिंदी साहित्य अकादमी’च्या पुनर्रचनेचा सुधारित शासकीय अध्यादेश काढून सांस्कृतिक विभागाने ‘हिंदी’ ही राष्ट्रभाषा नाही’, असे नमूद करत चूक सुधारली आहे. सांस्कृतिक विभागाचे उपसचिव विलास थोरात यांची या अध्यादेशावर स्वाक्षरी आहे.
देशामध्ये सर्वाधिक लोकांची बोली असलेल्या हिंदीला महाराष्ट्र सरकारकडून राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल करण्यात आला होता. राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्यात आली असून त्यासंदर्भात काढण्यात आलेल्या शासकीय अध्यादेशामध्ये हिंदी राष्ट्रभाषा असल्याचे ठळकपणे नमूद करण्यात आले होते.