अल्पवयीन मुलीचे छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन धर्मांधाची शरीरसंबंधाची मागणी !
जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे धर्मांधासह ५ जणांवर गुन्हा नोंद
सोलापूर – शहरातील एका अल्पवयीन मुलीचे छायाचित्र सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केल्याविषयी मुख्य आरोपीसह ५ जणांच्या विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मुसा रसूल शेख, इरफान शेख, मुसाची आई आणि वडील, तसेच इरफानची पत्नी यांच्याविरुद्ध लैंगिक अपराध अधिनियम २०१२ या कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी मुसा याने अल्पवयीन मुलीसमवेतचे असलेले छायाचित्र सामाजिक प्रसारमाध्यमांत प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली, तसेच तिला विवाह करण्यासाठी धमकावून, विवाह न केल्यास कुटुंबातील लोकांची अपकीर्ती करण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे सोडून देण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. संशयित आरोपींनी ‘मुलीचा मुसासमवेत विवाह लावून द्या, जर तिचा अन्य कुणाशी विवाह केल्यास सोडणार नाही’, अशी धमकी दिली आहे.
संपादकीय भूमिकामहिलांना त्रास देण्यामध्ये धर्मांध नेहमी पुढे असतात, यातून त्यांची वासनांध वृत्ती गेलेली नाही, हेच लक्षात येते. अशा वासनांधांना कठोर शिक्षाच करायला हवी ! |