सर्दी, खोकला आणि ताप यांमध्‍ये तुळशीचा उपयोग

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १३९

तुळस
वैद्य मेघराज पराडकर

‘सर्दी, खोकला आणि ताप यांवर तुळस हे रामबाण औषध आहे. हे विकार झाले असतांना तुळशीची २-२ पाने दिवसातून ३ वेळा चावून खावीत. तुळशीची १०-१५ पाने १ पेला पाण्‍यात उकळून वाफारा घ्‍यावा. दिवसातून २ वेळा १-१ कप तुळशीचा काढा (वाफारा घेऊन झाल्‍यावर शिल्लक रहाणारे पाणी) प्‍यावा. असे ३ ते ५ दिवस करावे. तुळस नेहमी उपलब्‍ध होण्‍यासाठी प्रत्‍येकानेच तुळशीची १-२ रोपे स्‍वतःच्‍या घरी लावावीत.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२३)

तुळशीचा वापर करा आणि आम्‍हाला कळवा !
संपर्क : ayurved.sevak@gmail.com