‘सीट बेल्ट’ न लावल्याने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी चूक स्वीकारून केली क्षमायाचना !
पोलीस वसूल करणार ५० सहस्र रुपये दंड !
(‘सीट बेल्ट’ म्हणजे चारचाकी वाहनात बसतांना सुरक्षेसाठी शरिराभोवती लावयचा पट्टा)
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सामाजिक माध्यमांसाठी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात ते गाडीत बसले असून त्यांनी ‘सीट बेल्ट’ काढला. ब्रिटनमध्ये ‘सीट बेल्ट’ न लावणे हा दंडनीय अपराध आहे.
British PM Rishi Sunak says sorry for not wearing seat belt https://t.co/L1hVsIL96S
— Republic (@republic) January 19, 2023
ऋषी सुनक यांनी ही चूक स्वीकारून क्षमा मागितली. तरीही ब्रिटन पोलीस त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून ५०० पाऊंड (जवळपास ५० सहस्र रुपये) दंड वसूल करणार आहेत.