अयोध्येत उभारल्या जाणार्या राममंदिराचे ‘दुकानदारी’ असे अवमानकारक वर्णन !
उत्तरप्रदेशमध्ये हिंमत बहादूर नावाच्या अधिकार्याकडून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान !
गाझीपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात कार्यरत नायब तहसीलदार हिंमत बहादूर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये बहादूर यांनी अयोध्येत उभारल्या जाणार्या राममंदिराचे वर्णन ‘दुकानदारी’ असे केले आहे. यासह त्यांनी मंदिरात जाणार्या लोकांना मूर्ख संबोधले आहे. गाझीपूरच्या जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणी चौकशीचे संकेत दिले आहेत. नायब तहसीलदाराच्या वक्तव्यावर अयोध्येच्या संतांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
सौजन्य न्यूज आपका सच
हिंमत बहादूर यांच्या या वक्तव्यावर हिंदूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बहादूर यांनी हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रामललाचे पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी बहादूर यांना नायब तहसीलदार या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना ईशनिंदेच्या आरोपाखाली कारागृहात टाकण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाप्रशासनात अशा हिंदुविरोधकांचा भरणा असल्यास ते हिंदूहित काय जपणार ? |