केरळमधून पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्याला अटक !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने बंदी घातलेली जिहादी संघटना पॉप्युुलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पी.एफ्.आय.चा) महंमद सादिक नावाच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली. कोल्लम् जिल्ह्यातील चावरा येथे धाड घालून तेथून आक्षेपार्ह कागदपत्रे, तसेच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले. सादिक याला या संघटनेत ‘रिपोर्टर’ (खबर्या) या नावानेही ओखळले जात होते. तो संघटनेच्या आक्रमण करणार्या गटाला मुसलमानेतरांची माहिती गोळा करून पुरवत होता. अशा लोकांची सूची तो बनवत होता. तो मुसलमान तरुणांचा बुद्धीभेद करून लष्कर-ए-तोयबा आणि इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनांत भरती करण्यासाठी चिथावत होता.
#LIVE | NIA’s crackdown on PFI continues; PFI activist taken into custody in Kerala.
Tune in to watch here – https://t.co/HbKDYgaNDs pic.twitter.com/Y83L3BDPzW— Republic (@republic) January 17, 2023
संपादकीय भूमिकामुसलमानेतरांवर आक्रमण करण्यासाठी त्यांची माहिती गोळा करून बनवत होता सूची ! |