हिंदु नाव ठेवून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्या मुसलमान तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चोपले !
इंदूर (मध्यप्रदेश) – पुणे शहरातील मुसलमान युवकाने इंदूरमधील हिंदु मुलीला फसवल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका रिक्शाचालकाच्या सावधगिरीमुळे हा प्रकार समोर आला. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मुसलमान युवकाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
इंस्टाग्राम पर हिंदू लड़कियों से दोस्ती: पुणे से आकर होटल में गर्लफ्रेंड को बुलाया, रिक्शा चालक को ऐसे हुआ शक…https://t.co/7Vx7dvQJwt #Indore #pune pic.twitter.com/wvmRSzlWSf
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) January 19, 2023
बजरंग दलाचे विभाग संयोजक तन्नू शर्मा यांनी सांगितले की, सदन खान महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीसमवेत आयटी पार्कमध्ये बसला होता. संघटन मंत्री विपीन राठोड, राहुल पांडे आणि इतर कार्यकर्ते येथे पोचले. सदन खान याला आधी नाव आणि पत्ता विचारल्यावर तो स्वतःला हिंदु म्हणवून घेत होता. त्याच्याकडून ओळखपत्र मागताच त्याने स्वतःचे नाव सदन सादिक खान असे सांगितले. त्याच्यासमवेत असलेल्या त्या विद्यार्थिनीला तो हिंदु नसून मुसलमान असल्याचे प्रथमच समजले. तिने सांगितले की, तो हिंदु नाव वापरूनच तिच्याशी भ्रमणभाषवर बोलत होता. तो मला भेटायला पुण्याहून इंदूरला आला.
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद रोखण्यासाठी लव्ह जिहादविरोधी कठोर कायद्याचीच आवश्यकता आहे ! |