पाकिस्तानमध्ये आता मुसलमानेतरांनाही कुराणाचा अभ्यास करावा लागणार !
पाकिस्तान सरकारचा निर्णय !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने देशातील सर्व विद्यापिठांमध्ये कुराण शिकवणे अनिवार्य केले आहे. यासंदर्भात संसदेत ठराव संमत करण्यात आला आहे. आता विद्यापिठांमध्ये कुराण भाषांतरासह शिकवले जाईल. कुराणचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यासाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही, तसेच विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणही मिळणार नाहीत. कुराण शिकवण्याच्या निर्णयामागे विद्यार्थ्यांना कुराण वाचण्यासाठी प्रेरित करणे, हा उद्देश आहे. त्यामुळे पाकमध्ये आता मुसलमानेतरांना, म्हणजे अल्पसंख्याक हिंदु आणि इतर समाजातील लोकांनाही कुराण वाचावे लागेल.
PAK में यूनिवर्सिटी के सभी छात्रों को पढ़नी होगी कुरान: तंगहाली से जूझ रहे पाकिस्तान की संसद में प्रस्ताव पासhttps://t.co/utOQOFnxYK#Pakistan #Education #Students pic.twitter.com/hvZRSGyrzc
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) January 19, 2023
जमात-ए-इस्लामीचे खासदार मुश्ताक अहमद यांनी या संदर्भात ठरास मांडला होता. ते म्हणाले की, कुराणातील कोणत्या गोष्टी योग्य ? आणि कोणत्या चुकीच्या आहेत ?, हे लोकांना कळले पाहिजे. लोकांना योग्य आणि चुकीची समज असणे फार महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच कुराण वाचले पाहिजे अन् ते जाणून घेतले पाहिजे.
संपादकीय भूमिकाभारतात सर्व धर्मियांना हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास करण्याचा कायदा करण्याचे धाडस भारतातील एकतरी सरकार करू शकेल का ? |