पठाण चित्रपट गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे प्रदर्शित झाल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन करू ! – काशिनाथ गडकरी, शिवसेना
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – शाहरूख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटातील एका गाण्यात अभिनेत्रीला भगव्या रंगाच्या तोकड्या पोशाखात दाखवले आहे. यातून हिंदूंसाठी पवित्र अशा भगव्याचा अपमान झाला आहे. अनेक राज्यात या चित्रपटाला विरोध होत आहे. तरी समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा अभिनेते शाहरूख खान यांची प्रमुख भूमिका असलेला आगामी पठाण चित्रपट गडहिंग्लज शहरातील चित्रपटगृहांनी प्रदर्शित करू नये; अन्यथा शिवसेना पद्धतीने आंदोलन करू, अशी चेतावणी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) उपशहरप्रमुख श्री. काशिनाथ गडकरी यांनी दिली आहे.