पुणे येथे धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद विरोधात ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ !
पुणे – ‘धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद’ यासाठी कडक कायदे करावेत, त्याची कठोरपणे कार्यवाही करावी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘बलीदान दिवस’ हा ‘धर्मवीरदिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, या मागणीसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने २२ जानेवारी या दिवशी ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ पोचेल, अशी माहिती ‘राजे शिवराय प्रतिष्ठान’चे अध्यक्ष महेश पवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
(सौजन्य : Lokshahi Marathi)
या वेळी ‘हिंदु गर्जना प्रतिष्ठान’चे धीरज घाटे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राचे अभ्यासक नीलेश भिसे, ‘पतित पावन संघटने’चे स्वप्नील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.