पंजाबमधील सैन्‍य मैदानात सापडले जिवंत बाँब !

अन्‍वेषण करतांना पंजाब पोलीस 

लुधियाना (पंजाब) – पंजाब पोलिसांनी खन्‍ना शहरातील सैन्‍याच्‍या मैदानात जिवंत बाँबची पेटी जप्‍त केली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक हरपाल सिंह यांनी दिली. हे जिवंत बाँब निकामी करण्‍यासाठी जालंधरचे एक पथक तैनात करण्‍यात आले होते. या प्रकरणी पुढील अन्‍वेषण चालू आहे. यापूर्वी ३ जानेवारीला राज्‍याचे मुख्‍यमंत्री भगवंत मान यांच्‍या निवासस्‍थानाजवळ जिवंत बाँब सापडला होता.

चंडीगडमध्‍येही सापडला जिवंत बाँब !

चंडीगडचे आपत्ती व्‍यवस्‍थापनाचे अधिकारी संजीव कोहली यांनी सांगितले की, चंडीगडमध्‍ये एक जिवंत बाँब सापडला आहे. सैन्‍य पथकाला पाचारण करण्‍यात आले असून परिसराची नाकेबंदी करण्‍यात आली आहे.

संपादकीय भूमिका

पंजाबमध्‍ये यापूर्वी झालेल्‍या हिंसाचारांच्‍या घटनांमागे खलिस्‍तान्‍यांचा हात असल्‍याचे उघड झाले आहे. सरकार याही घटनांचे त्‍या दृष्‍टीने अन्‍वेषण करणार का ?