‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी आणली पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘स्टेट प्रेस क्लब, मध्यप्रदेश’ यांच्या वतीने संवाद कार्यक्रमाचे आयोजन
इंदूर (मध्यप्रदेश) – देशभर ‘सीलबंद’ आणि अन्य खाद्यपदार्थ यांच्यावर उघडपणे ‘हलाल प्रमाणपत्रा’चा शिक्का मारला जात आहे. ज्या खाद्यपदार्थांवर असा शिक्का नसतो, तो पदार्थ मुसलमान खरेदी करत नाहीत. अशा स्थितीत बहुसंख्य हिंदु समाजाकडून अज्ञानामुळे हलाल प्रमाणपत्र असणारे खाद्यपदार्थ खरेदी करणे चालू आहे. त्यामुळे अशा ‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाचे लेखक रमेश शिंदे यांनी येथील ‘स्टेट प्रेस क्लब, मध्यप्रदेश’ यांनी आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘स्टेट प्रेस क्लब, मध्यप्रदेश’चे अध्यक्ष प्रवीण कुमार खारीवाल यांनी प्रस्तावना केली. श्री. रमेश शिंदे यांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते माला ठाकूर, मीना राणा शाह, सोनाली यादव, डॉ. मनीष काळे, जितेंद्र जाखेटिया, गणेश एस्. चौधरी, डॉ. कमल हेतावल, प्रीती भारद्वाज, अंजना यादव, शैलेंद्र श्रीमाल, रूपेश कटारिया यांनी केले. शेवटी समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते.