संभाजीनगर येथे रस्त्यावर लुटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ !
संभाजीनगर – शहरातील वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटल मॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनातील पर्यवेक्षक परमेश्वर वानखेडे (वय २७ वर्षे) हे १६ जानेवारी या दिवशी आस्थापनातील काम संपल्यावर सायंकाळी ७ वाजता दुचाकीवरून घरी जात होते. या वेळी वडगाव कोल्हाटीच्या गट क्रमांक जवळील खदानीत ७-८ जणांनी त्यांना अडवून बेदम मारहाण केली, तसेच धारदार शस्त्राने त्यांच्यावर प्राणघातक आक्रमणही केले. त्यांच्या खिशात असलेले १७ सहस्र रुपये काढून घेतले. या प्रकरणी वाळूज एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनत आहे. शहरात हत्या, महिला अत्याचार आणि मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.