होळीच्या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी सूचना
सोमवार, ६ मार्च २०२३ या दिवशी होळी आहे. ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने आदर्श होळी साजरी करणे आणि होळीतील अपप्रकार रोखणे यांविषयीचे प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य बनवले आहे. या प्रसारसहित्याच्या पुढील कलाकृतींच्या धारिका नेहमीच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.
१. ‘ए ४’ आकारातील ‘होळी धर्मशास्त्रानुसार साजरी करा !’ हे पाठपोट हस्तपत्रक.
२. २.२५ फूट × ३.५ फूट आकारातील पुढील फलक
अ. ‘आदर्श होळी’ अशी साजरी करा !
आ. रंगपंचमीतील अपप्रकार रोखा !
या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून ते होळी साजरी करणारी मंडळे, रहिवासी संकुल, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते आणि अन्य सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी मोठ्या प्रमाणात वापरावे, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.