बलुचिस्तानमध्ये इराणच्या सीमेवरून झालेल्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार
कराची (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तान प्रांताला लागून असलेल्या इराणच्या सीमेवर पाकच्या सैन्यदलाच्या तुकडीवर करण्यात आलेल्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार झाले. पंजगुर जिल्ह्यामधील चुकाब सेक्टरमध्ये ही घटना घडली. इराणच्या भूमीवरून हे आक्रमण करण्यात आल्याचा दावा पाकच्या सैन्याने केला आहे. हे आक्रमण बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या बलुची लोकांच्या संघटनेकडून करण्यात आल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बलूचिस्तान में गश्त कर रहे PAK सुरक्षाबलों के काफिले पर आतंकी हमला, 4 सैनिकों की मौत#balochistan #Pak
— AajTak (@aajtak) January 18, 2023
पाकिस्तानचे सैन्य बलुची लोकांवर प्रचंड अत्याचार करत आहे. त्याचा विरोध करण्यासाठी बलुची लोकांनी शस्त्र हातात घेतले आहे. इराणमध्ये बलुची मुसलमानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तेथून पाकमधील बलुची लोकांना साहाय्य मिळत असल्याचे म्हटले जात आहे.