विनाअट कोणत्याही देशाला अर्थसाहाय्य करणार नाही !

  • सौदी अरेबियाची घोषणा !

  • या घोषणेमुळे ऊठसूठ सौदीकडे पैसे मागणार्‍या पाकला झटका !

सौदी अरेबियाचे अर्थमंत्री महंमद अल् जदान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – सौदी अरेबियाने, ‘यापुढे आम्ही आमच्या सहकारी देशांना विनाअट कोणतेही आर्थिक साहाय्य देणार नाही’, अशी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे पाकिस्तानला झटका बसला आहे. पाकिस्तान नेहमीची कर्जासाठी सौदी अरेबियाकडे साहाय्य मागत असतो.

सौदी अरेबियाचे अर्थमंत्री महंमद अल् जदान यांनी स्वित्झर्लंडच्या दावोस येथे ‘वर्ल्ड इकनॉमिक फोरम’मध्ये, ‘आमचा देश आता पूर्वीच्या थेट आर्थिक साहाय्य देण्याच्या धोरणात पालट करत आहे. आता कोणत्याही देशाला विनाअट पैसे दिले जाणार नाहीत. आम्ही आता बहुपक्षीय संस्थांसमवेत काम करत आहोत, जेणेकरून विकास करता येईल. आम्ही आता लोकांवर कर लावणार आहोत. आम्ही अन्य देशांना साहाय्य करू इच्छित आहोत; मात्र अन्य लोकांनीही प्रयत्न करणे आवश्यक आहे’, असे म्हटले आहे.