यात्रेकरूंना हिंसकपणे ढकलणार्या शबरीमला मंदिराच्या सुरक्षारक्षकावर कारवाई व्हावी ! – केरळ उच्च न्यायालय
सुरक्षारक्षकाची हकालपट्टी !
मदुराई – शबरीमला मंदिराच्या गर्भागृहासमोर यात्रेकरूंना हिंसकपणे ढकलणार्या सुरक्षारक्षकावर (‘गार्ड’वर) कायदेशीर कारवाई व्हावी, असे मत केरळ उच्च न्यायालयाने व्यक्त केले. याविषयीचा एक व्हिडिओ सध्या प्रसारित होत असून त्यामध्ये मंदिराचा सुरक्षारक्षक यात्रेकरूंना हिंसकपणे ढकलतांना दिसत आहे. या घटनेचे काही व्हिडिओ पाहिल्यानंतर न्यायमूर्ती अनिल के. नरेंद्रन् आणि पी.जी. अजित कुमार यांच्या खंडपिठाने सुरक्षारक्षकाचे हातवारे आणि चेहर्यावरील हावभाव यांवर आक्षेप घेतला.
‘त्रावणकोर देवस्वम मंडळा’ने नियुक्त केलेल्या या रक्षकाच्या गैरवर्तणुकीविषयी शबरीमला मंदिराच्या विशेष आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे न्यायालयाने हा आदेश दिला. सुरक्षारक्षकाला मंदिरातील कर्तव्यातून मुक्त करण्यात आले असल्याची माहिती मंदिराकडून देण्यात आली.
संपादकीय भूमिकायावरून सुरक्षारक्षकांनाही धर्मशिक्षण देणे का आवश्यक आहे ?, हे लक्षात येते ! |