पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोनद्वारे शस्त्रपुरवठा !
नवी देहली – भारतीय सीमा सुरक्षादलाने पंजाबच्या गुरुदासपूरमधील उंचाटाकला गावात शस्त्रे जप्त केली. ही शस्त्रे पाकने त्याच्या ड्रोनच्या साहाय्याने येथे टाकली होती. पाककडून येणार्या ड्रोनचा आवाज भारतीय सीमा सुरक्षादलाच्या पथकाला ऐकू येताच त्यांनी ड्रोनच्या दिशेने गोळीबार केला. भारतीय सीमा सुरक्षादलाच्या पथकाला शोधमोहिमेच्या वेळी गावातील शेतात लाकडी चौकटी असलेले एक पाकीट पडलेले आढळून आले. हे पाकीट उघडल्यावर चिनी बनावटीची ४ पिस्तुले, ८ मॅगझिन आणि ४७ काडतुसे जप्त करण्यात आली.
संपादकीय भूमिकाअसे प्रकार रोखण्यासाठी कुरापतखोर पाकला नष्ट करणेच आवश्यक आहे ! |