नोएडा येथे शिक्षिकेने १६ वर्षीय मुलाला पळवून नेले !

समाजाचे अधःपतन झाल्‍याचे दर्शवणारी घटना !

नोएडा – शहरातील सेक्‍टर १२३ येथे २२ वर्षीय शिक्षिका घरी शिकवणी घेत होती. या शिकवणीला घरासमोरील १६ वर्षीय एक मुलगाही येत होता. तेव्‍हा शिक्षिका आणि १६ वर्षीय मुलगा यांच्‍यात प्रेम जुळले. १५ जानेवारी या दिवशी दुपारी मुलाने ‘मी काकूच्‍या घरी जात आहे’, असे सांगून तो घराबाहेर पडला. तो सायंकाळपर्यंत घरी आला नसल्‍याने मुलाच्‍या वडिलांनी पोलीस ठाण्‍यात मुलगा बेपत्ता झाल्‍याची तक्रार प्रविष्‍ट केली.

‘शिक्षिकेने मुलाला फूस लावून पळवून नेले’, असे या तक्रारीत म्‍हटले आहे. या तक्रारीच्‍या आधारावर शिक्षिकेवर गुन्‍हा नोंदवण्‍यात आला असून पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.