कुणीही ‘नायलॉन मांजा’ (दोरा) विक्रीसाठी ठेवल्यास कायदेशीर कारवाई ! – पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण, कोल्हापूर
कोल्हापूर – पतंग उडवतांना नायलॉन मांजाचा वापर केल्याने ‘सामान्य नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न होतो, तसेच पशू-पक्षी घायाळ होतात. पतंगासाठी नायलॉज मांजाची विक्री न करण्याविषयी उच्च न्यायालय आणि शासन यांनी निर्देश दिले आहेत. तरी दुकानदार, आस्थापने यांनी नायलॉन मांजा साठा, तसेच विक्री करू नये. असे केल्यास प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.