युक्रेनमधील हेलिकॉप्टरच्या अपघातात एका मंत्र्यासह १६ जण ठार !
कीव (युक्रेन) – येथील किंडरगार्टनजवळ एक हेलिकॉप्टर एका इमारतीला धडकल्यानंतर कोसळून झालेल्या अपघातात युक्रेनचे एक मंत्री, २ लहान मुले यांच्यासह एकूण १६ जणांचा मृत्यू झाला. डेनिस मोनास्टिसस्की असे मृत्यू झालेल्या मंत्र्याचे नाव आहे. ‘हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा झाला ?’, ‘ते इमारतीला कस धडकले ?’, हे अद्याप समजू शकलेले नाही.